आता ‍निर्बंध पुरे-श्रध्देला आडकाठी नको ! सरकारला लोकांची उपासमारी दिसत नाही का ?- राजेंद्र मस्के
 

‍भाजपाने श्री. क्षेत्र बेलेश्वर व कंकालेश्वर मंदीर येथे शंखनाद आंदोलन.!

बीड !

सरकारचे निर्बंध आता पाळनार नाही. बिअरबार, हॉटेल, मॉल, सुरु केले. मग मंदिर बंद का ? असा सवाल करत आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून मंदिर खुले केले. आज पासुन सरकारचे नियम पाळणार नाही. भक्तांच्या दर्शनासाठी हे मंदिर खुले राहिल सरकार भाविकभक्तांच्या श्रद्धेच्या आड येऊ शकत नाही. तिर्थक्षेत्र, धार्मीक स्थळे प्रख्यात मंदिरे यावर लाखो लोकांची छोटे मोटे व्यवसाय अवलंबून आहेत. अनेकांची रोजी रोटी या व्यवसायातुन चालते. गेली पाच  महिन्यापासुन मंदीरे बंद असल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात सर्व व्यवहार सुरळीत चालु असतांना केवळ मंदीराकडे सरकार जाणीवर्पूवक दुर्लक्ष करीत आहे. ही बाब अन्याय कारक असून सरकारला लोकांची उपासमारी का दिसत नाही. सरकारने भावीक भक्तांची श्रद्धा आणि धार्मीकतेवर अवलंबून असलेल्या गोरगरीब लोकांची उपासमारी बंदकरण्यासाठी राज्यातील मंदिरे तात्काळ खुली करावी. असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

राज्यातील धार्मीक स्थळे व मंदिरे खुली करण्यात यावी या मागणी साठी प्रदेश भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज आंदोलन पुकारले होते लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील  प्रसिद्ध तिर्थ क्षेत्र श्रीबेलेश्वर येथील मंदिरात टाळ मृदुंग घंटा व शंखनाद करत हर हर महादेव च्या जय जय कारात प्रवेश करून आंदोलन केले या आंदोलनात सरपंच गुंदेकर वसंत, किसन महाराज, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, सरपंच बाळासाहेब वायभट , दादासाहेब खिल्लारे, चेअरमन बाळासाहेब वायभट, सरपचं बाबासाहेब खिल्लारे, शरद बडगे, महेश सावंत, पंकज धांडे, सचिन आगाम, राकेश बिराजदार, सरपंच सुभाष पितळे, महाविर जाधव, अभिजीत गायकवाड, उद्धव जाधव, अवधुत ढास, रविंद्र कळसाने, दिलीप डोंगर, कृष्णा बहिरवाळ, पंकज माने, शरद सवासे, आबा येळवे, संजय काळे, शाम राऊत. आदि उपस्थित होते.

बीड शहर भाजपा तर्फे आंदोलन

आज पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी,लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे व लोकप्रिय दबंग खा.डॉ.प्रीतमताई साहेब मुंडे यांच्या आदेशावरून व भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज पेठ विभागातील कनकालेश्वर मंदिरात “मंदिर उघडून आरती,करुन शंखनाद, घंटानाद आंदोलन” करण्यात आले यावेळी भगीरथ बियाणी,डाँ.लक्ष्मण जाधव,भूषण पवार, विलास बामणे,संग्राम बांगर, बालकृष्ण सिकची,नागेश पवार,कपील सौदा,अमोल वडतीले,राजेश चरखा,सतीश तुसाबंड,ज्ञानेश्वर भामरे व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा