गरज सरो वैद्य मरो विचारसरणीच्या कृतघ्न सरकारला सदबुद्धी लाभो;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळमृदंग भजन आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे 

गरज सरो वैद्य मरो विचारसरणीच्या कृतघ्न सरकारला सदबुद्धी लाभो;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळमृदंग भजन आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड । कोरोनाने थैमान घातले असताना सरकारने कंत्राटी कर्मचा-यांची भरती केली मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याचा आरोग्यमंत्री दावा करत असतानाचा त्यांना सेवेतुन कार्यमुक्त करत बेरोजगार करत असून आगामी नोकर भरतीत त्यांचा विचार करण्यात येईल या श्ब्दाला सुद्धा सरकार जागत नसल्यामुळे एकंदरीतच “गरज सरो आणि वैद्य मरो ” विचारसरणीच्या महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी लाभो यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांच्या समवेत कोविड योद्धा संघर्ष समिती अध्यक्ष, संभाजी सुर्वे, डाॅ.संजय तांदळे, कंत्राटी कर्मचारी प्रीती सरवदे, योगिता गिते, मिरा कांदे, अमोल बहिरवाळ, सुधाकर ससाणे, शाहु वाल्हेकर,आदिंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळमृदंग भजन आंदोलन करण्यात येऊन सरकारने स्वतःचा जीव धोक्यात घालून कंत्राटी कर्मचा-,यांनी दिलेल्या योगदानाचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोरोना कालावधीत भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचा-यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अतिरिक्त संचालक यांनी निधीची कमतरता असल्याचे कारण देत ३१ ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश काढलेले असून जीव धोक्यात घालून कोविड सेंटर मधिल आरोग्य सेवा देणा-या कंत्राटी कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे. कोरोनाची महामारी पाहता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी २० जुलै २०२० रोजी मनुष्यबळ वाढवण्याच्या सुचना करत सर्वच जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हाॅस्पिटल मध्ये ३ महिन्यांचे कंत्राट देऊन शिपाई ते डाॅक्टर अशी हजारो पदे भरण्यात आली परंतु आता अपवादात्मक जिल्हे वगळता ईतरत्र रूग्णसंख्या कमी असल्याचा दावा करत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हे सर्व कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याच्या सुचना अतिरिक्त संचालकांनी दिल्यामुळे हजारो आरोग्य विभागातील सुशिक्षितांना बेरोजगार व्हावे लागणार आहे .

आरोग्यमंत्र्यांचा तिस-या लाटेचा ईशारा, रूग्णसेवेवर परीणाम -डाॅ.गणेश ढवळे

एकीकडे आरोग्यमंत्री राजेंश टोपे देशातील कोरोना रूग्णांचे वाढते प्रमाण पाहता तिस-या लाटेला सुरूवात झाली आहे काय अशी भिती व्यक्त करत केरळ नंतर महाराष्ट्रात रूग्णवाढ आढळून आली असून केंद्र सरकारने राज्य सरकारांना याबाबत सुचना केल्या असून या पार्श्वभूमीवर सरकार रात्रीची संचारबंदी लागु करण्याचे भाष्य करत असतानाच कोरोना महामारी संपुष्टात येण्या अगोदरच कंत्राटी कर्मचा-यांना सेवामुक्त करत असून त्यामुळे रूग्णसेवेवर मोठ्याप्रमाणात परीणाम होणार आहे.

जिल्हास्तरावर आपत्ति व्यावस्थापनातुन वेतन दिले जाऊ शकते

जरी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी निधीची कमतरता असल्याचे कारण देत सेवामुक्त केले असले तरी जिल्हास्तरावर आपत्ति व्यावस्थापन अथवा ईतर योजनांमधुन निधी जमा करत कंत्राटी कर्मचा-यांचा पगार देता येऊ शकतो सर्व आधिकार जिल्हाधिका-यांना आहेत त्यामुळे मनुष्यबळ कमी होऊन रूग्णसेवेवर परीणाम होणार नाही.

कोविड ड्युटीचे १०० दिवस पुर्ण करणारांना आगामी नोकर भरतीत सामाऊन घ्यावे

३ मे २०२१ रोजी कोविड ड्युटीचे १०० दिवस पुर्ण करणा-यांना आगामी सरकारी नोकरीत प्राधान्य मिळणार केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय अशा दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध होत आरोग्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली होती मात्र आता त्यांना याचा विसर पडला असून सरकारने आपला शब्द पाळत कोविड कालावधीत जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणा-या कंत्राटी कर्मचा-यांना योग्यतेनुसार नोकर भरतीत प्राधान्य द्यावे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा