जीके फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप

जीके फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप

दिंद्रुड। (प्रतिनिधी):-  धारुर तालुक्यातील चाटगाव येथील युवा उद्योजक गोविंद केकान यांच्या वाढदिवसानिमित्त जीके फाउंडेशन पुणे च्या वतीने पाच लाख रुपयांचा शालेय साहित्यांचे वाटप जिके फाउंडेशनच्या वतीने संपन्न झाले.

गोविंद केकान हे पुणे येथील उद्योजक असून वयाच्या 21 व्या वर्षी कोट्यावधी रुपयांची कंपनी टाकण्याचा सन्मान केकान यांनी मिळवला आहे. त्यांच्या कंपनीद्वारे शासकीय तथा निम शासकीय कंपन्यांना इन्व्हर्टर व बॅटरी पुरवठा केला जातो. या कमाईतून सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय दृष्ट्या उपक्रम त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे. यात 51 व्यक्तींनी रक्तदान केले जवळपास सात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पाच लाखांचे शालेय साहित्य जीके फाउंडेशन यांनी वाटप केले. संगणक संच, विद्यार्थ्यांना भाषण करण्यासाठी डायस, वर्ग कॉलिंग साठी टेबल, फळा, आदी साहित्य जीके फाउंडेशनच्यावतीने वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जी के फाउंडेशन चे कृष्णा केकाण,उद्धव केकाण, लक्ष्मण दराडे, कृष्णा हंगे, कृष्णा सांगळे यांनी केले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा