यंदाही दहीहंडी साधेपणाने साजरी 

बीड  : दरवर्षी गोपाळकालानिमित्त शहरात दहीहंडीचा उत्सव शिगेला असतो. मात्र मागील वर्षीपासून कोरोनामुळे साधेपणाने हा सण साजरा होत आहे. यंदाही प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करण्यात आली. तर काही ठिकाणी अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, हँडवॉशचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मात्र भाविकांचा उत्साह तितकाच दिसून आला.
गो गो गोविंदा म्हणत एकावर एक मानवी थर उभारून शहरात दरवर्षी अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. शहरवासीयांसोबतच अनेक मानाच्या दहीहंडी आयोजक हा सण साजरा करतात. यात तरुणांसह, बच्चे कंपनी तसेच महिला मंडळांचाही मोठा सहभाग असतो. ढोल, ताशे, डीजेच्या तालावर उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा लागते. या सर्व उत्साहात मोठे बक्षिसेही दिली जातात. मात्र गतवर्षीपासून कोरोनामुळे यावर निर्बंध आले आहेत. यामुळे आयोजकांसह भाविकांत नाराजी दिसत असली तरी कोरोनाच्या हद्दपारीसाठी सर्वजण साधेपणाने सण साजरा करण्यात सहभाग देत आहेत. सोमवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यांनतर मंगळवारी दि.31 ऑगस्ट रोजी गोपाळकाला साजरा करण्यात आला. यानिमित्त दहीहंडी होणार नसल्याने अनेकांनी अन्नदान केले. तर काहींनी मास्क, हॅन्डवॉश व सॅनिटायझरचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविले. कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फ खिचडीचे वाटप करण्यात आले. येथे राधाकृष्ण वेशभूषेत अनेक चिकमुकल्यांनी उत्सवात सहभाग घेतला.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा