चिकनगुनिया, डेंगू सारख्या आजारामुळे दवाखाने हाउसफुल जनतेच्या आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; न.प.ने फवारणी करावी – विश्वास शिनगारे




चिकनगुनिया, डेंगू सारख्या आजारामुळे दवाखाने हाउसफुल

जनतेच्या आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; न.प.ने फवारणी करावी – विश्वास शिनगारे

किल्ले धारुर | (प्रतिनिधि) वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार वाढत आहेत त्यामध्ये चिकनगुनिया डेंगू सारखे आजार पुन्हा डोके वर काढू लागल्याने सर्व दवाखाने हाउसफुल दिसू लागले आहेत आता लवकरात लवकर नगर परिषदेने संपूर्ण शहराची फवारणी करून घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष विश्वास शिनगारे यांनी दिला आहे.

आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कोरोनाच्या मारीत लक्षात आलेच असेल परंतु पुन्हा आरोग्याचा खेळ सुरूच आहे की काय असाच प्रश्न उद्भवत आहे स्वच्छता अभावी दुर्गंधी पसरत चालल्याने डेंगू चिकनगुनिया सारखे आजार वाढत आहेत त्याकडे कोणाचे‌‌च लक्ष नसल्याने दवाखाने हाऊसफुल होताना दिसत आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळ पुन्हा सुरू आहे आता तरी नगर परिषदेने याकडे लक्ष घालून फवारणी करून स्वच्छता करून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष विश्वास शिनगारे यांनी दिला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा