शिवसंग्रामच्या सिंहाच्या कळपात सामिल व्हा! – रामहरी मेटे यांची तरुणांना आर्त हाक




 

मांजरसुबा l (प्रतिनिधी)-आ. विनायकराव मेटे साहेबांनी मराठा समाजाला शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे याच्यासाठी संघर्ष सुरु केला आहे.महाराष्ट्रभर मराठा आरक्षण यात्रा, मोर्चे, परिषदा, मेळावे, धरणे आंदोलन हे जे-जे मार्ग आरक्षण मागणीसाठी व समाजाच्या प्रश्नांसाठी अवलंबता येतील ते-ते अवलंबण्याचे काम आ. विनायकराव मेटे यांनी केलेले आहे.संपूर्ण राज्यात जनजागृती मेळावे घेऊन, समाज जागृतीचे काम ते करत आहेत.
त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात समाज जागृतीसाठी हर ग्राम शिवसंग्राम हे अभियान २७ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. अभियानाची सुरुवात श्री क्षेत्र चाकरवाडी येथून करण्यात आली असून जिल्हयात व तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी शिवसंग्राम संघटनेची विचारधारा पोहोचविण्यात येत आहे. गाव तिथे शाखा स्थापन करण्यात येत आहे ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी आ. मेटे साहेबांच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत.
या पार्श्वभुमीवर हरग्राम शिवसंग्राम अभियानांतर्गत नेकनुर येथे शिवसंग्राम शाखेचे उदघाटन शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी या अभियानाचे अध्यक्ष तथा शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष श्री रामहरीभैय्या मेटे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, शिवसंग्रामने आतापर्यंत मराठा आरक्षण, मुस्लीम आरक्षण,धनगर आरक्षणाबाबत केलेली कामे, भविष्यातील पक्षाची धोरणे हे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे नियोजन केले आहे.त्यामुळे नेकनुर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हरग्राम शिवसंग्राम चा नारा देऊन गावोगावी अभियानात सहभागी व्हावे.तसेच उपस्थित तरुणांना शिवसंग्रामच्या सिंहाच्या कळपात सामील व्हा अशी आर्त हाक त्यांच्या वतीने देण्यात आली. व हे अभियान यशस्वी करा
असे आवाहनही यावेळी रामहरीभैय्या मेटे यांनी केले.यप्रसंगी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते खालेक पेंटर साहेब यांनीही आपले महत्वपुर्ण मत मांडले.यावेळी माजी पं.स.सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, नेकनूर सर्कल प्रमुख विनोद कवडे, माजी पंचायत समिती सदस्य फिरोज पठाण, शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते सुंदर बापू शिंदे व चंद्रकांत शिंदे, ऋषिकेश सुरवसे , संतोष चौधरी,शेख नासिरभाई,सुरज बहीर,नेकनुर शाखाअध्यक्ष- शेख शाकेरभाई उपाध्यक्ष- नदीम कारभारी सचिव-सय्यद शाकेर, कोषाध्यक्ष- पठाण आमेरखान सहसचिव- अखिल आत्तार सदस्य व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा