या शुभ वेळेत गणपतीची प्रतिष्ठापना करा, या मंत्राचा जप करा अन् लाभ मिळवा
मुंबई : सध्दा प्रत्येकजण गणेशभक्त गणेश चतुर्थी उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहे. याच दिवशी लोक आप-आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना करतात. हा गणपती बाप्पाचा उत्सव 10 दिवस जल्लोषात चालतो. लोक मनाने खूप सेवा करतात. गणपतीला विविध पदार्थ देण्यात येतात. यावेळी प्रत्येकजण भक्तमय होतो. या काळात गणपतीच्या आवडत्या गोष्टींचा समावेश केला जातो अन् पूजा पूर्ण विधीसह करण्यात येते.
गणपतीची आरती केली जाते. घर दिवे आणि दिव्यांनी सजवले जातात आणि 10 दिवसांनंतर, अनंत चतुर्दशीला, गणपतीचे मोठ्या उत्साहाने विसर्जन करण्यात येते. पण या सगळ्यात एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे गणपतीची स्थापना करता वेळीचा शुभ वेळ. असे बोलले जाते की जर गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर करण्यात आली तर ती खूप फलदायी ठरते. त्यामुळे, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करता शुभ वेळ हुकून देऊ नका. मोठे पुण्य मिळते.

बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याची शुभ वेळ घ्या जाणून : 

गणपतीची प्रतिष्ठापनाची ही आहे शुभ वेळ : गणेश चतुर्थी हा सण शुक्रवारी 10 सप्टेंबर 2021 रोजी आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे. पूजेची शुभ वेळ दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही 10 सप्टेंबरला रात्री 12 नंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करू शकतात. यामुळे, तुम्हाला मोठे पुण्य लाभेल.

बाप्पाच्या मंत्राचा जप : गणपतीची स्थापना झाल्यानंतर त्यांची संपूर्ण विधीसह घरात पूजा करावी. पूजेच्या वेळी, एखाद्याने ओम गणपतये नम: या मंत्राचा जप करावा. फायदा होईल. त्याचबरोबर प्रसाद म्हणून मोदक आणि लाडू वाटप करा. मान्यतेनुसार मोदक आणि लाडू हे दोन्ही गणपतीला खूप प्रिय आहेत.

गणेश विसर्जन : गणपती घरी 10 दिवस ठेवला जातोय. त्यानंतर बाप्पाचे विसर्जन अन्नत चतुर्दशीच्या दिवशी करण्यात येते. बाप्पाचे विसर्जन मोठ्या थाटामाटात केला जतो. या वर्षी अन्नत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप देण्यात येतो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि 20 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. गणेश विसर्जनासाठी हा शुभ काळ ठरणार आहे.

असा असेल वेळ 

सकाळी मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
सकाळी मुहूर्त – दुपारी 7:39 ते 12:14 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
संध्याकाळी मुहूर्ता- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
रात का मुहूर्ता – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा