शामसुंदर या स्मरणिकेचे प्रकाशन श्री महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या शुभहस्ते




स्व शामसुंदर काळे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून चांगली कामे केली-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.08(प्रतिनिधी)ः- जिल्ह्यात पाणी अडवून जिरवता यावं म्हणून शाम सुंदर काळे यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून चांगली कामे करून समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आलेख उंचावला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बुधवार दि.08 रोजी शामसुंदर या स्मरणिकेचे प्रकाशन श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज, बंकटस्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री सुरेश नवले, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी आ.प्रा.सुनिल धांडे,नंदकिशोर मुंदडा, दिनकर कदम, अरूण डाके, अशोक हिंगे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के
सुशिलाताई मोराळे, रमेश पोकळे, रामहरी मेटे, सुधीर काकडे, प्रा.सर्जेराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, शामसुंदर काळे यांचे वडील आणि काकूंचे खूप जुने संबंध होेते, कृषि क्षेत्रात त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी आपली पुढची पिढी चांगली घडावी म्हणून चांगले काम केले. शामसुंदर काळे हे इंजिनियर म्हणून काम करीत असताना त्यांनी बुध्दीबळाच्या खेळात त्यांनी चांगले विद्यार्थी घडवून बुध्दीबळ हा खेळ सर्वदूर पर्यंत जावा, राज्यात व राज्याबाहेर आपले विद्यार्थ्यांनी यश मिळवावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असेही ते म्हणाले.
याशिवाय नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, लक्ष्मण महाराज मेंगडे,कुंडलिक खांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दिलीप गोरे, सुभाष सपकाळ, शिवाजी जाधव, किशोर पिंगळे, रमेश चव्हाण, संजय जाधव, कांचन गायकवाड, प्रा.सर्जेराव काळे, बळीराम गवते, अनिल घुमरे, नितीन धांडे, गणेश मस्के, विठ्ठल बहीर, सचिन उबाळे, सुनिल सुरवसे, सखाराम मस्के, महेश धांडे, गोरख शिंदे, रवी शिंदे, युवराज मस्के यांच्यासह महिला पुरूषांची उपस्थिती होती.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा