आ.मेटेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात श्रींची आरती संपन्न
 

मुंबई (वार्ताहर)।:– विघ्नहर्ता गणरायाचे दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर रविवारी अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. महाराष्ट्रातील घराघरांत गणेशोत्सव साजरा होत असला तरी प्रत्येक घरात गणेशासाठीची आरास वेगळी आणि पूजा पद्धतीही वेगळी. राजकिय नेतेमंडळी देखील आपल्या घरातील गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात.गणेशाचे भक्त असलेले आ. विनायकराव मेटे यांची मुंबईच्या सिद्धीविनायकावर प्रचंड श्रद्धा आहे. वैयक्तिक काम हाती घेण्यापूर्वी आणि प्रत्येक वाढदिवसाला ते सिद्धीविनायकाचे दर्शन हमखास घेतात. मागील 20 वर्षांपासून आपल्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. कुठेही आणि कितीही धावपळीत असले तरी ते गणेश चतुर्थीदिवशी कुटूंबियांसह घरीच असतात.यंदाही त्यांनी मुंबईच्या वडाळा येथील भक्तीपार्कात श्री गणेशाची स्थापना केली होती.
आ.विनायकरावजी मेटे यांच्या निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला..दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी त्यांच्या चाहत्यांसह आमदार, खासदार, मंत्री येत असतात.अनेक मान्यवरांचे श्रीगणेशाच्या आरती साठी याही वर्षी आगमन झाले.यामध्ये प्रमुख्याने विरोधी पक्षनेते मा.प्रवीनजी दरेकर यांनी दि.१८ सप्टेंबर रोजी व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाच्या आरती साठी हजेरी लावून .मोदक, खोबऱ्याच्या लाडू व पुरणपोळीचा श्रीं ना प्रसाद भरवून विधीवत पुजा आरती केली. या वेळी आ.मेटे सह त्यांच्या सौभाग्यवती सौ.ज्योतीताई मेटे, आ. भारतीताई लव्हेकर, विक्रांत आंब्रे,राजन घाग व इतर पदाधिकारी,कार्य्कर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा