राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा




राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. आजपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाचा धुमधडाका असण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Marathwada patra  Team

20 September 2021

मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. आजपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाचा धुमधडाका असण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2-3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे, राज्यात आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

 

राज्यात इथे होणार पाऊस :
कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

1)20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया येथे यलो अलर्ट आहे.

2)21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, गोंदिया येथे यलो अलर्ट आहे.

3) 22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली येथे यलो अलर्ट आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा