शिक्षकांच्या स्वाभिमानासाठी स्वाभिमानी मैदानात -पाटील




 

बीड l- गेल्या वीस वर्षांपासून राज्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आतापर्यंत उपाशी ठेवून व 20 %व 40 %वेतन सुरू करून शासनाने क्रूर चेष्टा केली आहे त्यामुळे शिक्षकांना शिक्षक म्हणून स्वाभिमानाने जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शिक्षक संघटना या शिक्षकांना स्वाभिमानी जिवन जगण्यासाठी आवश्यक असलेले वेतन सुरू करण्यासाठी मोठा लढा उभा करणार असल्याचे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के पी पाटील यांनी बीड येथील ब्राईट फ्युचर अकादमीत आयोजित सहविचार सभेत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेशउपाधयक्ष परमेश्वर पालकर, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहुल कांबळे, स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश पवार, नुतून जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की फक्त या शाळांना वेतन द्यायच्या वेळीच शासन विविध अडचणी समोर आणून वेळ मारून नेत आहे व लढा उभा करणार्या शिक्षकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करत आहेत. आमचा सुड उगवणे थांबवून आम्हाला भाकरी द्या लाथा आणि काठ्या खाणयाइतकीही ताकद आमच्या शरीरात आता रहायलेली नाही त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गानेच शिक्षक समन्वय संघ व आमची संघटना आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकर यांनी बोलताना सांगितले की विविध चौकश्या लावून या शाळांच्या पाठीमागे लावलेले ससेमिरे थांबवून या शाळांना आता प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे. पुढील आंदोलनात शिक्षकांचे संघटन असलेल्या स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या सर्वानी खंबीरपणे पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
उच्च माध्यमिकचे कांबळे यांनी वीस वर्षापासून या शाळांना शासनाने इंगरजाप्रमाणे फोडाफोडीचे राजकारण करून झुलवत ठेवले आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शैक्षणिक क्षेत्रातील लाजिरवाणी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले विचार मांडले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बडे यांनी केले तर सुत्रसंचालन शेळके एल डी यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते.

निवड
स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी -दत्तात्रय चव्हाण,जिल्हासचिव-बळीराम देवकते,
जिल्हाउपाध्यक्ष-तात्यासाहेब तांदळेजिल्हाउपाध्यक्ष-सहदेव मुंढे, जिल्हासमन्वयक-संभाजी इंगोले, जिल्हा सहसंघटक – काशीद बी आर, जिल्हा सहसचिव – शेळके एल डी, जिल्हा चिटणीस – झोडगे ए डी यांची निवड करण्यात आली आहे तर तालुका बीड तालुका अध्यक्ष आबुज सोमनाथ, धारूर तालुकाध्यक्ष केदार एम डी, केज तालुकाध्यक्ष इतापे ए डी, वडवणी तालुकाध्यक्ष वडमारे दिपक यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यावेळी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा