रस्त्याच्या निषेधार्थ कर्तव्यदक्ष आमदारांचा केला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक -डाॅ. ढवळे
 

पाटोदा l तालुक्यातील मौजे तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तिवरील दुध उत्पादक शेतक-यांनी ओढ्यातुन प्रवास, चिखलवाट तुडवित गावात दुध डेअरीवर जावे लागत असून लोकप्रतिनिधींकडून होणा-या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आज दि.२५ सप्टेंबर शनिवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली नेमाने वस्तिवरील दुध उत्पादकांनी तथाकथित कर्तव्यदक्ष आमदारांचा प्रतिकात्मक दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले.

पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तिवरील शेतक-यांचा दुध उत्पादन व विक्री हा प्रमुख व्यवसाय असून वस्तिवरील शेतक-यांना रस्ता नसल्यामुळे १ किलोमीटर अंतरावरील वस्तिवर ओढ्यातुन, चिखलवाट तुडवित जावे लागते ,तसेच त्याठिकाणी असणारे खड्डे, आणि चिखल असल्याने ग्रामस्थांना शेतातुन नविन तयार करावी लागली असून नेमाने वस्तिवरील बहुसंख्य दुध उत्पादक असून दुध गावात पोहचवण्यासाठी लागणा-या कष्टामुळे दुध व्यावसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षाच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक आंदोलन l

पाटोदा तालुक्याला आ.बाळासाहेब आजबे आणि आ.सुरेश आण्णा धस यांच्या रूपाने दोन आमदार लाभले असले आणि यांनी कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी अद्याप वस्तिवरील ग्रामस्थांना रस्ते, वीज, पाणी आदि मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरले असून वारंवार निवेदन देऊन कंटाळलेल्या नेमाने ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून प्रतिकात्मक कर्तव्यदक्ष आमदारांना दुग्धाभिषेक लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात नामदेव नेमाने, निवृत्ती नेमाने,बळीराम नेमाने, अशोक नेमाने ,भागवत नेमाने संतोष तांबे, गणेश तांबे, अशोक भाकरे, अंकुश नेमाणे ,मारोती नेमाने, मुरलीधर नेमाने, रामहरी नेमाने, दत्तात्रय नेमाने, तुकाराम तांबे आदि. सहभागी होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा