लाईनमन नितीन विद्यागर यांची तात्काळ बदली करा -हात्ते
 

महावितरण अधिक्षाक अभियंता बीड यांच्या कडे मागणी

तलवाडा प्रतिनिधी।

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील लाईनमन नितीन विद्यागर हे व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी तलवाडा ग्रामपंचायत चे सरपंच यांनी महावितरण अभियंता अधिक्षक बीड, तसेच गेवराई कार्यालय यांच्याकडे केली आहे.

लाईनमन हे वेळेवर कोणतेच काम नकरताच ,नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत, विधुत फॉल्ट झाल्यावर त्यांना कळवून ही वेळेवर काम करत नाहीत, फोन बंद करून ठेवतात त्या मुळे त्यांच्या बदलीसाठी हे पाऊल उचलले असून . कोणत्याही नागरिकांनी फोन लावला तर उडवा उडवीचे उत्तर दिले जात आहे. वेळ प्रसंगी मोबाइल बंद असतो. लाईटच्या नादुरुस्त मूळे शिक्षण घेण्यासाठी ऑनलाईन विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक, शेतकरी, व्यापारी, यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लाईनमन नितीन विद्यानगर यांची बदली करून त्यांच्या ठिकाणी प्रामाणिक काम करणाऱ्या लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी तलवाडा ग्रामपंचायत चे सरपंच यांनी महावितरण अधिक्षक अभियंता बीड, तसेच गेवराई कार्यालय यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जर लवकरात लवकर बदली नाही केली तर तलवाडा येथील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे माहिती सरपंच पती विष्णु हात्ते यांनी दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा