अतिपावसामुळे सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान




पिंपळनेर : गेल्या दोन तीन दिवसापासून तालुक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने आगोदरच पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या सोयाबिन, कापस पीकाचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनचे भाव समाधान मानून बळीराजा वावरत आसताना पावसासह, सोयाबिनचे भावही कोसळले आहेत.  त्यामुळे बळीराजा  हताश झाला असून दुहेरी संकटात शेतकारी सापडला आहे. व्यापार्‍यांनी प्रती क्विंटल 8 हजार भाव जाहीर केला होता. अशा परिस्थितीत अचानकपणे भाव 4 हजारावर आणला आहे. सद्याच्या पावसाने शेतातील पीक बाहेर काढणे अवघड झाले आहे.  करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सरासरी उत्पन्न सुध्दा मोठ्या प्रमाणात घटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा