डोक्यावर साहेबांचा हात होता म्हणुन सर्व काही मिळाल पंकजाताईच्या पाठीमागे भावाच्या भुमीकेत राहू




धुळ्याचे नुतन महापौर नाना कर्पे यांचे भावनिक उद्‌गार!

परळी वैजनाथ । दि.29 :- 1986 पासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी धुळ्यात काम करतो सहा वेळा नगरपरिषदेला सतत निवडून आलो साहेबांचा हात डोक्यावर पडल्यापासून माझ्या जीवनात मिळालेलं यश सर्व श्रेय त्यांना जात मला आई वडिलांनी जन्म दिला तरी खरा जन्मदाता माझा साहेब होते त्यामुळे महापौर पदी निवड झाल्यानंतर मी गोपीनाथ गडावर नतमस्तक होण्यासाठी आलो पंकजाताई यांच्या पाठीमागं भावाच्या नात्यातून मी खंबीरपणे उभा असून खऱ्या अर्थाने माझी बांधिलकी समजतो .ताई साहेबांचा चेहरा पाहिल की मोठ्या साहेबांना भेटल्याचे समाधान होतं असल्याचे भावनिक उदगार धुळे महानगर पालिकेचे नवनिर्वाचित महापौर नाना करपे यांनी काढले यशश्री बंगल्यावर आल्यानंतर त्यांचा पंकजाताई च्या हस्ते सत्कार करण्यात जिल्हा भाजपाच्या वतीने त्यांचा पंकजाताई च्या हस्ते सत्कार करण्यात आला
नाना कर्पे हे मुंडे साहेबाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखले जातात . उत्तर महाराष्ट्रात साहेबांच्या जिवाभावाचा कार्यकर्ता ही त्यांची ओळख वर्षानुवर्षाची आहे . काही दिवसांपूर्वी त्यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर काल त्यांनी गोपीनाथ गडावर येऊन समाधीस्थळाचे आशीर्वाद घेतला . शिवाय पंकजाताई यांची सहपरिवार भेट घेऊन आशीर्वाद मागितला दरम्यान यावेळी जिल्हा भाजपाच्या वतीने नाना करपे यांचा सत्कारही करण्यात आला . छोटेखानी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले मुंडे साहेब माझ्यासाठी पितृतुल्य दैवत असून विद्यार्थिदशेत असताना त्यांची ओळख झाली 1986 ला माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला त्याचाच परिपाक म्हणून मी आज महापौर आहे . अनेक वर्षे त्यांच्या हाताखाली काम करताना खूप आठवणी आहेत हे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाही . मला मुलासारखं त्यांनी घडवलं, उत्तर महाराष्ट्रात मुंडे साहेबांचा घराघरात फोटो आम्ही लावला असून ती आमची श्रद्धा . साहेबांच्या नंतर भगिनी पंकजाताईनी आम्हाला अंतर न देता लावलेलं प्रेम कौटुंबिक जिव्हाळा वाढवणारं ठरलं . ज्या साहेबांनी मला सर्व काही दिलं त्यांच्या लेकीला मी कधीच विसरू शकत नाही भगिनी च्या पाठीमागे आगामी काळात खंबीरपणे उभा राहणार हे सांगण्यासाठीच मी यशस्वी बंगल्यावर आल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं . यावेळी माजी आमदार आर टी देशमुख मोहनराव जगताप राम कुलकर्णी सलीम जहांगीर देविदास नागरगोजे उषा ताई मुंडे रमाकांत बापू मुंडे बिपिन ढाकणे बाबरी आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा