औरंगाबाद येथे लोकनेते आ.सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली महाएल्गार बैठक संपन्न




औरंगाबाद येथे लोकनेते आ.सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली महाएल्गार बैठक संपन्न

औरंगाबाद । येथे मराठवाडास्तरीय अन्यायग्रस्त आदिवासी जमातींची महाएल्गार बैठक माजी मंत्री तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे माजी अध्यक्ष आ. सुरेश आण्णा धस यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो समाजबांधवांच्या उपस्थित संपन्न झाली.
अनु.जमातींच्या मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील सर्व अन्याग्रस्त आदिवासी समाजातील महादेव कोळी , मल्हार कोळी, ठाकर -ठाकूर, मन्नेरवारलू व इतर सर्व अन्यायग्रस्त आदिवासी समाजातील अधिसंख्य पदाबाबत, माजी न्या. हरिदास कमिटीचा अहवाल, व.सु.पाटील तसेच २००० पासुन औरंगाबाद कमिटीने दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची पुर्नरचौकशी, तसेच २२ जुलै २०२१ रोजीचे गुन्हा दाखल करणे बाबतचे पत्र, भारतीय संसदेने १९७६ रोजी क्षेत्रबंधन उठवलेले असल्याने TSP/OTSP रद्द करावे, मराठवाड्यातील वैधताधारकांवर जाणीवपूर्वक SIT चे भूत Re-Open कार्यवाही रद्द करण्यात यावी, हरिदास समितीतील अनेक चांगल्या शिफारशी डावलून OTSP मधील आदिवासींना विरोध करणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात यासह इतर विषयावर चर्चा केली व पुढील दिशा ठरविण्यासाठीची ही महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार रमेश दादा पाटील, डॉ.मोहन गायकवाड, नागनाथजी घिसेवाड, चेतन पाटील, डॉ.मोहन गायकवाड, सुरेशजी आंबुलगेकर, अविनाश कोळी, डी. एम. कोळी, मिलिंद ठाकर, रमेश बारसकर, सुनिल बळवंते यांच्यासह बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक व अन्य जिल्ह्यातील आदिवासी संघटना व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा