शाळेची घंटी वाजणार ! पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी- कवठेकर




 

शाळेची घंटी वाजणार ! पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी- कवठेक

कोरोना महामारी च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शहरी भागातील व ग्रामीण भागातील शाळा बंद होत्या राज्यातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे 4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत राज्यातील कोरोनाची संक्रमण स्थिती काही प्रमाणात निवळ्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे गत दोन वर्षानंतर महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील शाळा आजपासून उघडणार आहेत विद्यार्थ्यासमवेत पालकांचीही कोरोनाचे नियम पालन करण्याची जबाबदारी आहे तरी पालकांनी आपल्या पाल्याची योग्य ती काळजी घेऊनच शाळेत पाठवावे पालकांनी आपल्या मुलांना मास्क लावूनच शाळेत पाठवावे मुलांना शाळेत जाताना पिण्याचे पाणी सोबतच द्यावे शक्य झाल्यास मुलांना सॅनिटायझर देऊन वेळोवेळी त्याचा वापर करण्यास सांगणे पालकांनी आपल्या मुलाला सर्दी,ताप,खोकला येत असेल तर शाळेत पाठवू नये मुले शाळेतून घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुऊन घरात येण्यास सांगणे अशा प्रकारची योग्य ती काळजी घेऊन पालकांनी आपल्या मुलास शाळेत पाठवावे. दोन वर्षानंतर विद्यार्थी आपल्या शालेय सवंगड्याशी भेटणार आहेत शाळा सुरू झाल्यानंतर शालेय परिसर पुन्हा एकदा पहिल्यासारखा गजबजणार आहे. आज पासून शाळा सुरू होत आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत तसेच बीड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर कवठेकर यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा