स्त्रीशक्ती – झाशीची रणरागिणी लक्ष्मीबाई
 

स्त्रीशक्ती – झाशीची रणरागिणी लक्ष्मीबा

 

प्रत्येकात आत्मशक्ती असतेच.ती ओळखून योग्य वेळी तिचा योग्य वापर करून आपले लक्ष साध्य करता यायला हवे.फुलाप्रमाणे कोमल असणारी स्त्री वेळप्रसंगी अन्यायाचा प्रतिकार करताना रणचंडीकेचा अवतार धारण करते.तिच्यातील आत्मिक बळच तिला दुष्टांचे खंडन करण्यास प्रवृत्त करते.
मूर्तिमंत वात्सल्यरूप असणारी माता,प्रसंगी रौद्र रूप धारण करून शत्रूशी लढा देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई..पराक्रमी नानासाहेब पेशवे यांनादेखील लढाईत हरवणारी मोरोपंत तांबे यांची ही वीरकन्या, जिने बालपणीच पराक्रमाचे धडे घेतले होते.शक्तीचे स्वरूप असणारी नेवाळकरांची ही स्नुषा जिने स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले.
तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली
भा. रा.तांबे यांच्या वरील काव्यपंक्तीत त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांना महाकालीची उपमा दिली आहे.खरोखरच महाकालीप्रमाणे वीरत्वाचे वरदान लाभलेल्या या वीरांगनेने आपल्या अलौकिक पराक्रमाने शत्रूस जेरीस आणले.दत्तक पुत्र नामंजूर करून कपटाने राज्य बळकावू पाहणाऱ्या इंग्रजांच्या डावास “मेरी झाॅंसी मैं नहीं दुॅंगी..!!”असे त्वेषाने उत्तर देऊन शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाने लढणाऱ्या या रणरागिणीस आजची ही दुसरी माळ मी अर्पण करत आहे.अन्यायाविरुद्ध लढा देताना आमच्यातील आत्मशक्तीची जाणीव होऊन ते धैर्य सदैव आमच्या मनात चेतत राहावे हीच कामना.

-प्रणाली म्हात्रे
– विक्रोळी मुंबई.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा