रामनगर येथिल स्नेहसावली अनाथालयात ड्रेस वाटप करून आर्यनचा वाढदिवस साजरा




रामदास लिंबागणेशकरांचा सामाजिक उपक्रम !

बीड । तालुक्यातील लिंबागणेश येथिल आर्यन फाउंडेशनचे संस्थापक रामदास फाळके यांना अनाथालयात अथवा पालावरचं जिणं जगणा-यांना वस्त्र अथवा किराणा सामान पुरवण्यासाठी कुठल्याही कारणाची आवश्यकताच नसते बारामाही हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येतच असतो. याचा आम्हा लिंबागणेशकरांना सार्थ अभिमान वाटतो.
आज दिनांक २४ ऑक्टोबर रविवार रोजी रामदास फाळके यांच्या मुलाचा आर्यनचा वाढदिवस त्यानिमित्त बीड मधिल स्नेह सावली अनाथ आश्रम, रामनगर येथील मुलांना नविन ड्रेसचे वाटप करण्यात आले याचवेळी त्याचे अनाथालयातातील चिमुकल्यांनी औक्षण करून केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक भास्कर ढवळे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,लोक पत्रकार भागवत तावरे, मुक्त पत्रकार संतोष ढाकणे, जालिंदर काकडे, धनंजय गुंदेकर, हनुमंत जाधव, पांडुरंग घरत, विष्णु साबळे, वाल्मिक फाळके, बाबु आबदार, व स्नेह सावली बालघर चे निलेश मोहीते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा