वेतनवाढीसाठी एसटीचा बंद !
जिल्हाभरातील एसटी बसेस  बंद ; प्रवाश्यांची गैरसोय !
बीड।- एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना वार्षीक वेतनवाढीचा दर 3 टक्केप्रमाणे करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी आज संयुक्त कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी बंद पुकारला. या बंदमुळे व एसटीची वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. जिल्हाभरातील एसटी बसेस त्या त्या डेपोमध्ये थांबवण्यात आल्या होत्या. एसटी बसेसच्या या बंदमुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय झाली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदाज करावा. सणोत्सव उचल 12 हजार 500 दिवाळी पुर्वी अदा करावी आणि दिवाळीपुर्वी 15 हजार रुपये बोनस द्यावा, या मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती बीडच्या वतीने एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी बंद पुकारला. या बंदमुळे एसटी बसेस ज्या त्या महामंडळात थांबवण्यात आल्या आहेत. या बंदने प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय झाली. बीड शहरासह धारूर, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी, केज, वडवणी येथील महामंडळाचे कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा