नवनाथ आण्णा शिराळे यांनी अवयव दानचा संकल्प करून वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी केला साजरा




नवनाथ आण्णा शिराळे यांनी अवयव दानचा संकल्प करून वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी केला साजरा

बीड (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत भाजपा चे सरचिटणीस तथा माजी न.प. सभापती नवनाथ आण्णा शिराळे यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करून आपला वाढदिवस एक युवकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

सर्व प्रथम सकाळी श्री. सोमेश्वर हनुमान मंदिर बार्शी रोड बीड येथे श्री सोमेश्वर महादेवाची आरती करून गोरगरिबांना फराळ व अन्न दानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, याचा लाभ सर्व गोरगरीब परिसरातील नागरिकांनी घेतला.त्यानंतर आदिवाशी सेवा प्रकल्पाला भेट देऊन त्या ठिकाणी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रकल्पातील अध्यक्ष श्री भोसले सर यांनी आभार व्यक्त करून नवनाथ अण्णा शिराळे यांना शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या बडेजावला फाटा देताना परंपराही टाळून भाजपचे सरचिटणीस तथा बीड न.प.चे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे यांनी मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करुन एक वेगळेच औक्षण रुढ केले आहे. सद्य:स्थितीत वाढदिवस वाजतगाजत साजरा करण्याचे फॅड रुजले आहे. तरुणाईमध्ये तर याची विशेष क्रेझ आहे. मात्र याला छेद देत आपण समाजाचे देणेकरी आहोत, अशी समर्पणाची भावना ठेऊन नवनाथ आण्णा शिराळे यांनी सोमवार दि.१५ नोव्हेंबर रोजी बीड जिल्हारुग्णालयाकडे अवयव दानाचा फॉर्म भरुन दिला.व मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प या वेळी केला.
वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे, बीड च्या खासदार प्रीतमताई मुंडे,जिल्हाध्य राजेंद्रजी मस्के यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या, तशेच प्रत्येक्ष भेटून अनेक सामाजिक ,राजकीय ,वकील, डॉ.यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी डॉ., ऍड गोविंद शिराळे, कृष्णा शिराळे ,दै. मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा