फॅशन – शो मध्ये तुलसी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश




 

फॅशन – शो मध्ये तुलसी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

बीड । आर जे ड्रीमलँड आयोजित फॅशन शो 2021, नुकताच बीड शहरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, येथे संपन्न झाला. या फॅशन शोमध्ये मोठ्या गटात तुळसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,संत ज्ञानेश्वर नगर बीड येथील एकूण 10 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. पैकी कुमारी कोमल शिंदे व कुमारी प्रांजली उमापुरकर या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक विजेतेपद पटकावून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आहे. तर छोट्या गटातून तुलसी इंग्लिश स्कूलच्या कुमारी हर्मिका बालाजी जगतकर या 8 वी च्या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक विजेत्या पदाचा मान मिळविला.
Covid-19 आजाराच्या प्रादुर्भावा नंतर प्रथमच बीड शहरात फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटक दिव्या शेट्टी( मिस वर्ल्ड नोबेल क्वीन), प्रमुख अतिथी- डॉ.सारिकाताई क्षीरसागर, प्राचार्य- अश्विनी बेद्रे,सी.एन. ए. फिटनेस- सिद्धार्थ डीजे- मॅजिक फोटो- सौभाग्य लॉन्स-दोहा प्लाजा जी मार्ट- साखरे मंडप यांच्या सर्व संचालकांसह आयोजक रविराज जेधे उपस्थित होते.
या वेळी वेगवेगळ्या विभागातून फॅशन शो मध्ये सहभाग घेऊन नव युवतींनी स्फूर्तीदायक प्रतिसाद दिला. प्रसंगी परीक्षकांना ही गुणांकन करताना कसरतीचे कार्य करावे लागले,तर प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून उल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते. संगीतांच्या सुरांनी व विद्युत रोषणाईच्या रंगाने तर आगळावेगळा आनंद निर्माण केला होता. शहरातील हजाराहून अधिक लोकसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आनंद घेतला.
यावेळी बक्षीस वितरणा प्रसंगी सर्व अतिथी समवेत दीपा प्रदीप रोडे (अध्यक्ष, तुलसी महिला मंडळ बीड) यांनी उपस्थिती दर्शवून विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यश संपादित केल्याने संस्थेचे संचालक मा. प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्य- उमा जगतकर (तुलसी इंग्लिश स्कूल), सर्व प्राध्यापक, शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थिनींना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा