गुटखा प्रकरणी शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर गुन्हा दाखल




कुंडलिक खांडेना कुमावतांनी खाकी दाखवली
गुटख्याच्या छाप्यात शिवसनेचे जिल्हाप्रमुख आरोपी !
केज ! दि. 17 (प्रतिनिधी) :
कुंडलिक खांडे यांच्या कुंडलीत शनी अनेक दिवसापासून त्यांना पकडण्याची संधी शोधत होता काल अखेर गुटखा भोवला . सत्ता पक्षाचे जिल्हाप्रमुख असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या कुमावत यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून गुटखा सारख्या पिढी बरबाद करणाऱ्या धंद्यात त्यांनी केलेली कार्यवाही लक्षवेधी ठरली आहे .
केज तालुक्यातील नांदुर घाट येथे काल ए.एस.पी पंकज कुमावत यांनी एका गुटखा विक्री करणार्‍या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. यानंतर त्याच्याकडून माहिती घेत बीड तालुक्यातील इमामपुर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला होता. या प्रकरणी आज केज पोलिसात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह इतर तीन जणांवर ३२८ ,२७२ ,२७३ कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती केज पोलिसांनी दिली आहे. परंतु यामध्ये इतर आरोपींना देखील अटक करण्यात येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
………………
कानून के हाथ लंबेच
अनेकदा कुंडलिक खांडे यांना खाकी पासून अभय मिळाल्याची चर्चा आहे . मात्र केजच्या पोलिसांनी त्यांना कायदा दाखवला असे बोलले जात आहे !

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा