महावितरण शेतकऱ्यांनच्या मुळावर – आमटे
 

पुढाऱ्यांचे कारखाने, सूतगिरण्या, कॉम्प्लेक्स,जिनिग सुरू मग शेतकऱ्याची का वीज तोडली ?

बीड ।  शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,उडीद,कापूस,या पिकाचे अतिवृष्टी मुळे अतोनात नुकसान झाले आहेत अनेक शेतकऱ्याचे संपूर्ण शेती वाया गेली आहेत अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी शेतात कांदा, भाजीपाला,इतर पाण्यावरचे पीक घेऊन थोडे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे
महावितरणच्या शेतकऱ्यांनच्या शेतीचे वीज कनेक्शन तोडण्याच्या तुघलकी आदेशाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे महावितरण हे फक्त शेतकऱ्यांनपुढे दादागिरी दाखवत आहे अनेक पुढाऱ्यांनचे कारखान्याचे वीज थकीत आहेत,अनेक सूतगिरण्याचे राजकीय पुढार्यांच्या कॉम्प्लेक्स चे वीज बिल थकीत आहेत, औद्योगिक वसाहतीत अनेक व्यापाऱ्यांचे वीज बिल थकीत आहेत त्यांचे वीज तोडली जात नाही व गोर-गरीब शेतकऱ्याच्या वीज तात्काळ का तोडल्या जातात? तात्काळ शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन जोडण्यात यावीत अन्यथा शिवसंग्राम शेतकरी आघाडी शेतकऱ्यांनासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशारा बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन देण्यात आला या वेळी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,कायदे सल्लागार
अँड.शरद जी तिपाले शेतकरी नेते माने सर,मुकुंद लोणकर,हर्षद बहिर,संतोष घोलप.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा