बीड – पिंपळनेर – नाथापूर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन




बीड – पिंपळनेर – नाथापूर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन

मोठ्या संख्येने सहभागी व्हा..! रस्ता आंदोलन समितीकडून आवाहन !


बीड (प्रतिनिधी) :- बीड – पिंपळनेर – नाथापूर रस्त्यासाठी या भागातील गावांमधील युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. कित्येक वर्षांपासून हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नसून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे ओळखनेही कठीण झालेले आहे. 1 खासदार, 2 आमदार, 3 जिल्हा परिषद सदस्य, 4 पंचायत समिती सदस्य या भागातील गावांतून मतदानाद्वारे निवडून दिले गेले असताना सर्व दुर्लक्ष करत आहेत.
जवळपास 50 गावांमधील युवकांनी या रस्त्यासाठी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तब्बल 15 पेक्षा अधिक गावांनी तसे पत्र देखील रस्ता समितीकडे दिले असून ही पत्रे आज निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहेत. या आज मंगळवार रोजी होत असलेल्या निदर्शन आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रस्ता आंदोलन समितीकडून करण्यात आलेले आहे.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा