महाधन च्या क्राॅपटेक खताचा विक्री शुभारंभ
महाधन च्या क्राॅपटेक खताचा विक्री शुभारंभ

बीड। भारतात सर्वप्रथम महाधन निर्मित कांदा पिकासाठी संतुलित खताची निर्मिती करण्यात आली असून या क्राॅपटेक खताचे विक्री शुभारंभ सोहळ्याचा कार्यक्रम बीडच्या मांजरसुंबा येथील मंत्री कृषी सेवा केंद्र येथे बुधवारी संपन्न करण्यात आला.विभागीय विक्री व्यवस्थापक सचिन गोलेकर, विभागीय विपणन व्यवस्थापक संतोष कदम सह बीड जिल्हा विपणन व्यवस्थापक ओमप्रकाश बेलापुरे, अमोल ठोंबरे, कृष्णा सपकाळ, अमोल शेलार, शिवप्रसाद गाताडे, संदेश कडपे, राहुल गेजगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मंत्री कृषी सेवा केंद्राचे जगदीश मंत्री, दिलीप मंत्री, योगेश मंत्री,संकल्प मंत्री, शितल ऍग्रो एजन्सीचे संचालक सुशील सुशील कासट यांनी उपस्थितांचे स्वागत केले.बीड जिल्ह्यातून महाधन कंपनीचे अधिकृत वितरक व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

कांदा पिकासाठी आवश्‍यक अन्नद्रव्यांचा गरजेनुसार निर्माण करण्यात आलेले हे क्राॅपटेक खत असून प्रत्येक दाण्यांमध्ये सर्व अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती यावेळी कंपनी द्वारे देण्यात आली.खतावरील 20 टक्के खर्च कमी करणे कांद्याची गुणवत्ता वाढवणे उत्पादनक्षमता वाढविणे आदी फायदे या क्राॅपटेक खताचे असून कांदा पीक धारकांसाठी महाधन या कंपनीचे क्राॅपटेक
खत कांद्यासाठी वरदान ठरणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा