कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार- मेंडके
कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार श्री दोलाजी मेंडके

बीड । आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केज येथे तहसील कार्यालयात आयोजित मिशन वात्सल्य समिती च्या बैठकीत कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाकडून विविध योजनांची माहिती देऊन विविध योजनांचे तहसिल कार्यालयात फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी मिशन वात्सल्य समिती चे अध्यक्ष तथा तहसीलदार दोलाजी मेंडके ,नायब तहसीलदार श्रीमती आशा वाघ , कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आठवले , बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा लटपटे, महिला बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी लहु राऊत, पशुसंवर्धन विभागाच्या श्रीमती तांदळे , विस्तार अधिकारी श्री जहागिरदार, श्री नानजकर तसेच केज तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना तहसीलदार दोलाजी मेंडके साहेब यांनी विधवा भगिनींना विश्वास दिला की प्रशासन आपल्या सोबत असुन आपणास मिशन वात्सल्य समन्वय समितीच्या माध्यमातून संपुर्ण 25 प्रकारच्या योजना देण्याचा प्रयत्न केला जाईल .
तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या माझ्या समोर मांडा मी त्या सर्वोतोपरी सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
कोरोना संसर्गामुळे एक पालक गमावलेल्या तसेच अनाथ झालेल्या 54 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला असून 4 अनाथ बालकांच्या प्रत्येकी 5 लक्ष रुपयांची बॅंकेत ठेव ठेवली असुन उर्वरित बालकांना लवकरच लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाला माहिती पाठवण्यात येईल असे महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी लहु राऊत यांनी सांगितले.
कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेतुन तात्काळ लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार आशा वाघ यांनी दिले.
शासन आपल्या दारी या संकल्पनेवर मिशन वात्सल्य समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून संबंधित पात्र लाभार्थी यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना , घरकुल योजना, शिधापत्रिका, वारसा प्रमाणपत्र, कृषी विषयक योजना, मालमत्ता विषयक हक्क, अंत्योदय योजना या सर्व योजना सर्व लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात येणार असल्याचे मिशन वात्सल्य समिती अध्यक्ष तथा तहसीलदार दोलाजी मेंडके यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा