आंतरराष्ट्रीय परिषदेत बीडच्या तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन महाविद्यालयाला प्रथम पारितोषिक




वनस्पतींपासून बनवले गारमेंटस् : मान्यवरांच्या हस्ते सन्मान 

बीड। पुणे येथील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित ग्रीन फॅशन इंडियामध्ये बीडच्या तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, या कॉलेज मधील तीन विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक पटकावले. वनस्पतींपासून व फुलापासून रंग तयार करून हे गारमेंटस् तयार करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

ग्रीन फॅशन इंडिया, आंतरराष्ट्रीय परिषद पुणे येथे २५ ते २६ नोव्हेंबर 2021 रोजी पार पडली.
यात परदेशातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शंभरहून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. ग्रीन इनेसेटिव्ह शोकेस या विषयात झेंडूची फुले, पारिजातक फुले, रक्तचंदन तसेच इतर वनस्पतींच्या ओल्या व वाळलेल्या फुलांचा वापर करुन रंग तयार केला होता त्या रंगाचा वापर ड्रेस डिझायनिंग मध्ये वापरला होता.यात सुप्रिया ससाणे, ऋुतुजा पेंढारे, शुभांगी खेडकर या तीन विद्यार्थिनींनी फिडींग गारमेंट तयार केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत, प्रथम पारितोषिक मिळवून विद्यार्थिनींनी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आहे. तिन्ही विद्यार्थिनींचा फॅशन डिझाईनिंगमधील तज्ज्ञ बेंजामीन इटर (जर्मनी) व मेहेर कॅसलिनो (फॅशन जर्नालिस्ट) यांच्या हस्ते प्रमाणपत्र ,स्मृतिचिन्ह व ब्युटी प्रोडक्टस् देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी डॉ.उज्वला चक्रदेव(एस. एन. डी. टी. कुलगुरू,मुंबई),मा.संतोष कटारिया,मा.राहुल मेहता यांचीउपस्थिती होती. या स्पर्धेसाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन च्या प्राचार्या अश्विनी बेद्रे,विभाग प्रमुख प्रा.विद्या अवघडे, प्रा.पायल राठोड प्रा.रसिका बाहेती, प्रा.धनश्री सांगोले, प्रा.प्रियंका बचुटे, प्रा.श्रध्दा डाके, प्रा. अर्चना साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.

….
*तुलसी महाविद्यालयकडून विशेष गौरव*

आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावल्याबद्दल सुप्रिया ससाणे, ऋुतुजा पेंढारे, शुभांगी खेडकर या तीन विद्यार्थिनी सह अन्य सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याबाबत तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मणराव ( दादा)रोडे, तुळसाबाई रोडे,तुळशी शैक्षणिक समूहाचे संचालक मा. प्रा. प्रदीप रोडे, तुलसी महिला मंडळाच्या अध्यक्ष, दीपाताई रोडे, तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मा. उमा जगतकर तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे, डॉ. प्रियंका रोडे, तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, देविदास निकाळजे उपस्थित होते. यावेळी सर्व विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह, मेडल, वृक्ष रोप देऊन मा. लक्ष्मणराव(दादा) रोडे व तुळसाबाई रोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा