रुग्णवाहिकेला सामोरा-समोर धडक एकजण ठार
रुग्णवाहिकेला सामोरा-समोर धडक एकजण ठार
बीड – बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर बीडवरून कोल्हापुरकडे जात असलेल्या भरधाव कारने नगरवरून बीडकडे जात असलेल्या रूग्णवाहिकेला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
  या अपघातामध्ये एक जण ठार तरा अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्याना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरील घटना सकाळी 8.30 दरम्यान बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर सुर्डी फाटा ता.आष्टी येथे घडली. अवधुत नंदकुमार गरगटे रा.इचलकरंजी वय 31 वर्ष असे अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 सोमवारी दुपारी पुण्याला रूग्ण घेऊन गेलेली रूग्णवाहिका रूग्ण सोडुन (MH.20,EG.5130) बीडला जात असताना बीडवरून कोल्हापुर कडे जात असलेली कार (MH.09 BM.5986) ही भरधाव वेगात असल्याने सुर्डी फाट्यावरील वळणावर समोरासमोर दोनही वाहनाची जोराची धडक झाली. झालेल्या अपघातात अवधुत गरगटे हा जागीच ठार झाला असुन अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रूग्ण वाहिका चालक संतोष सुरवसे रा.बीड हा किरकोळ जखमी झाला आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा