पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसची रॅली
जीवनावश्यक वस्तूंमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केल्याने पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बीडमध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी काढली रैली ।

बीड l देशामध्ये भाजप नरेंद्र मोदी चे सरकार आल्यापासून सर्वसामान्यांची प्रचंड हाल होत असून  जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढवुन उद्योगपती मित्रांचा फायदा केला जात आहे. मोदी सरकारच्या उद्योगपती धार्जिणे व सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने बीड शहरामध्ये तेलगाव नाका परिसरामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख ,युवक नेते आदीत्य दादा पाटील व शहराध्यक्ष डाॅ.इद्रीश हाश्मी यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठी रॅली काढून जनजागरण करण्यात आले.

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणामुळे देशामध्ये डिझेल- पेट्रोलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.घरगुती गॅस सिलिंडर किंमती तीन पटीने वाढल्या आहेत. खाद्य तेलाच्या किमती दुपटीने वाढले आहेत.जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मध्ये प्रचंड वाढ करून मोदी सरकारने गोरगोरीबांना चे जीवन प्रचंड महाग करून ठेवले आहे.यामुळे लोकांच्या मनात मोदी सरकार विरोधात प्रचंड राग आहे..हा राग व्यक्त करण्यासाठी व यासाठी जनजागरण करण्यासाठी बीड शहर काँग्रेस च्या वतीने बीड शहरातील तेलगाव नाका,आदीत्य कालेज परीसर,गांधी नगर ,मोमीन पुरा परीसरात दारोदारी जावुन जनतेसोबत संवाद करण्यात आला.

या प्रसंगी कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शहराध्यक्ष डाॅ.इद्रीश हाश्मी, ओबीसी जिल्हा अध्यक्ष वचिष्ट बडे, असंघटीत कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे,राहुल टेकाळे,अशोक बहीरवाल,गणेश बजगुडे,राहुल मोरे,परवेज कुरेशी,अॅड.नितीन वाघमारे,झाकीर पठाण,साजीद सलीम, सय्यद मोशीन,शेख अब्बास,जमीर भाई,सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा