चिंचवण येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
चिंचवण येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मोठ्या संख्याने युवाकांनी उपस्थित राहावे :- संजय आंधळे 

वडवणी l   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या सामाजिक दृष्टीकोनातून रक्तदानांची गरज सर्वञ अंत्यत निर्माण झाली आहे. देशात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला प्राण गमववा लागला आहे. म्हणुन कोणत्याही व्यक्तींचा जिव वाचायला हवा म्हणुन या जानवीतेन गेली दहा वर्षे रक्तदान शिबीराचे आयोजन स्व.गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येत आहे. तसेच गेल्यावर्षी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमीत्त वडवणीत कोरोनाकाळात रेकॉर्डब्रेक रक्तदान झाले होते. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे केंद्रीय ग्रामविकासमंञी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता वर्ष 11 व्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उद्घघाटक म्हणून बीड लोकसभाच्या लोकप्रिय खासदार प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. केशवराव आंधळे तर माजी आमदार आर. टी देशमुख, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सोमनाथराव बडे, महादेव रेडे, यांची विशेष उपस्थित राहणार आहे. या भव्य शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते संजय आंधळे यांनी केले आहे.

वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे केंद्रीय ग्रामविकासमंञी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्ताने शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आंधळे यांनी गती वर्षी प्रमाणेच याही वर्षी वर्ष 11 वे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार केशवराव आंधळे, प्रमुख पाहुणे म्हणून
माजी आमदार आर. टी देशमुख, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सोमनाथराव बडे, महादेव रेडे, यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी तालुक्यातील सर्व सरपंच, सर्व चेअरमनसह अदिच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत आहे. मुंडे साहेबांच्या जयंती निमत्ताने वडवणी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिरास व विविध कार्यक्रमास तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आंधळे व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ईश्वर तांबडे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा