बीड ग्रामीण पोलिसांची गुटख्यावर कारवाई 20 लाखांच्या मुद्देमालासह दोघे घेतले ताब्यात
बीड l आयशर टेम्पोमधून आणलेला गुटखा छोट्या वाहनात भरून तो इतरत्र पार्सल करण्याचा गोरख धंदा रात्री सुरू असताना बीड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पाच लाखांच्या गुटख्यासह दोन वाहने आणि दोन इसम असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना बीड जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्याची वाहतूक आणि विक्री होत आहे. आयशर भरून बाहेरून आलेल्या गुटख्याची बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोसापुरी शिवारातील मारुती शोरुमच्या पाठीमागे एका चारचाकी वाहनात भरून त्याची इतरत्र विक्री करण्याच्या उद्देशाने रात्री गुटखा उतरवला जात होता. या वेळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय पवनकुमार राजपुत, पो.नाईक लोणके, चालक पो.ना. बडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावरून त्यांनी रात्री साडेतीन वाजता घोसापुरी शिवारातील मारुती शोरुमच्या पाठीमागे छापा टाकला असता त्यानंा एक लाल रंगाचे आयशर (क्र. एम.एच. 17 बी.डी. 3521) व झायलो (क्र. एम.एच. 43 डी. 7911) मिळून आल्या. या वेळी आयशर टेम्पोमधून झायलोमध्ये गुटखा माफिया गुटख्याचे पोते टाकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्या वेळी दोघांना ताब्यात घेतले असता त्यामध्ये अक्षय रमेश भोर (वय 30, व्यवसाय – चालक), रा. वळती (ता. अंबेगाव जि. पुणे ह.मु. जव्हेरी गल्ली, बीड), सुशील ओमप्रकाश तुसांबड (वय 45, रा. नागोबा गल्ली, पेठ बीड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी झायलो गाडीत गुटख्या 12 पोते मिळून आले तर आयशर टेम्पोमध्ये तीन लाखांचा गुटखा असा एकूण 5 लाखांचा गुटखा आणि दोन वाहने मिळून पोलिसांनी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही वाहने ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले असून गुटखा माफियांसह चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख संतोष साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवनकुमार राजपुत, लोणके, बडे, मोराळे, वरपे यांनी केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा