आधी तिला ठार मारले नंतर स्वतः संपविले जीवन




आधी तिला ठार मारले नंतर स्वतः संपविले जीवन

वैतागवाडी येथील आत्महत्याचे गूढ उलघडले 

नेकनूर। रामनाथ घोडके दि . १७ येथून जवळच असलेल्या – वैतागवाडीमध्ये पती – पत्नीचा मृतदेह गुरुवारी ( दि . १७ ) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती . आज मृतदेहांचे उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना मिळाले असून यात धक्कादायक माहिती समोर आली आहे . आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला . नंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी दिली आहे .

नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे ( वय -२५ ) व त्यांची पत्नी दिपाली राजेश जगदाळे ( वय २० ) या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती . नेकनूर पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल आज आले असून यात दीपालीचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे . दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशने आधी दीपालीचा खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले आहे . याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून पती – पत्नीच्या वादातुन हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे . दीपालीचा 11 महिन्यापूर्वी विवाह झाला होता आणि ती सात महिन्याची गर्भावती ही होती . आता या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा