बीड जिल्ह्यातील भारतीय मराठा महासंघाच्या सर्व शाखा बरखास्त- जिल्हाध्यक्ष लक्ष्मणदादा पवळ




बीड जिल्ह्यातील भारतीय मराठा महासंघाच्या सर्व शाखा बरखास्त- जिल्हाध्यक्ष लक्ष्मणदादा पवळ

 बीड (प्रतिनिधी):- जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दाद पवळ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे. भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक मा. श्री किसनराव वरखीडे यांच्या विचारावर गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असलेले, बीड येथील लक्ष्मण दादा पवळ यांनी प्रदेशाध्यक्ष व स्थानिक गटबाजीला कंटाळून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून लवकरच सर्व सहकाऱ्यांना विचारात घेऊन आपण योग्य निर्णय घेनार असल्याचे त्यांनी या वेळी  सांगितले व आपल्या कार्यकाळात आमच्या सहकाऱ्यांनी बीड आणि गेवराई तालुक्यात 51 शाखा स्थापन केल्या होत्या , या सर्व शाखा बरखास्त करण्यात आल्याची ही माहिती लक्ष्मण दादा पवळ यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा