नगरपालिकेला गरिबांच्या टपऱ्या दिसतात परंतु भांडवलदारांचे अनधिकृत बांधकाम दिसत नाहीत का?
बीड नगर पालिका प्रशासना भांडवलदार धार्जिणे– प्रशांत वासनिक

नगरपालिकेला गरिबांच्या टपऱ्या दिसतात परंतु भांडवलदारांचे
अनधिकृत बांधकाम दिसत नाहीत का?

बीड l  शहरात अनेक ठिकाणी असणारे अतिक्रमण काढणे बाबत अनेक दिवसापासुन तक्रार देण्यात येत आहेत परंतु जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषद प्रशासन हे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आज बीड शहरातील नगर रोड भागातील लहान मोठे व्यवसाय करून उपजिवीका भागविणाऱ्या व्यावसायिकांच्या टपऱ्या व दुकाने नगर पालिका प्रशासने काढल्या व या उलट शासकीय जागेवर कायम स्वरूपी पक्के बांधकाम करून अनेक वर्षापासुन भाडेकरू ठेवुन बेकायदेशिर पैसा कमविणाऱ्या लोकांकडे नगर पालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय डोळे झाक करीत आहेत.
शासकीय जागेवर बेकायदेशिर रित्या पक्के बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशिररित्या कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला आमचा व्यवसाय सुरळीत करू द्यावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले बसपचे मराठवाडा झोन प्रभारी प्रशांत वासनिक विशाल सूर्यवंशी, एम एम शेख, शेख अकबर, विशाल मस्के, वीर आलम पठाण विशाल खंडागळे व्यवसायिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा