शेतकऱ्यांना मोफत सातबाराचे वाटप




शेतकऱ्यांना मोफत सातबाराचे वाटप
 आष्टी l  परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथे दि.31 रोजी तलाठी पेठकर यांनी गावातील शेतकरी यांना मोफत सातबाराचे वाटप केले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल भूमिअभिलेख आधुनिक कार्यक्रम ई- महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या, आज्ञावली मधून संगणिकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक सातबारा अद्यावत उताराच्या प्रती सर्व गावांमध्ये त्या त्या सज्जास असलेल्या  तलाठी यांच्या मार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन  मोफत देण्याच्या उद्देशाने  विशेष मोहीम महाराष्ट्र जमीनमहसूल शासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून काऱ्हाळा येथे तलाठी जि.एस. पेठकर यांनी शेतकरी यांना संगणिकृत डिजीटल सातबाराचे वाटप केले आहे.या सोबतच ज्या शेतकरी यांच्या सातबारा मध्ये काही त्रुटी असल्यास किंवा काही विसंगती आढळल्यास अभिप्राय नमुना ही वाटप करण्यात आला आहे.याद्वारे साताबारामध्ये खातेदाराचे नाव,क्षेत्र,फेरफार क्रमांक, भूधारणा पद्धती, पीक पाहणी केली आहे किंवा नाही इतर हक्कात नोंदीमध्ये बदल करायचे असल्यास तसा अभिप्राय शेतकरी नोंदवून संबंधित तलाठ्याकडे देण्याची सुविधा करण्यात आली आहे.यावेळी तलाठी जि.एस.पेठकर यांच्यासह गावातील शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा