नेकनुरच्या पत्रकारांनी घरोघरी वृत्तपत्र टाकणा-या मुलाची वेदना जाणली; सायकल चोरीला गेली! नविन घेऊन दिली!!




नेकनुरच्या पत्रकारांनी घरोघरी वृत्तपत्र टाकणा-या मुलाची वेदना जाणली; सायकल चोरीला गेली! नविन घेऊन दिली!!

नेकनूर प्रतिनिधी। अनेक वर्षांपासून सायकलने घरोघरी पेपर टाकण्याचे काम करीत असलेल्या नेकनूर येथील शिवराज वनारसे याची सायकल 20 डिसेंबर रोजी घरासमोरून चोरी गेली पेपरचे काम करीत असल्याने पोलीस सापडून देतील या आशेवर बसलेल्या शिवराजला दहा दिवसानंतर ही निराशा आल्याने अखेर नेकनूर मधील पत्रकार बंधूनी पैसे जमा करून नवीन सायकल दिली
नेकनुर येथील शिवाजी वनारसे हा मुलगा अनेक वर्षापासून घरोघरी सायकलवर वृत्तपत्र वितरणाचे काम करतो ,आठवडाभरापुर्वी त्याची सायकल चोरीला गेली, मग त्याने ही बाब पोलिसांसह बीड ,नेकनूर येथील वृत्तपत्राच्या पत्रकार बंधुंना सांगितली सायकल मुळे त्याची पेपर टाकण्याची मोठी अडचण होत असल्याने बीड येथील पत्रकारांनी नेकनूर पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना त्या सायकल चोराचा शोध लावून त्याची सायकल परत द्यावी यासाठी फोन केले बातमी लावली मात्र दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसाकडून सहकार्य होत नसल्याने अखेर नेकनुरमधील पत्रकारांनी त्याला नवीन सायकल घेऊन देण्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये जमा करून बुधवारी सकाळी सायकल दिली . सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे हे कळसंबर येथे जात असताना त्यांनाही याची माहिती असल्याने सर्वांसोबत पाचशे रुपयांची मदत केली. यामध्ये पत्रकार अशोक शिंदे ,मनोज गव्हाणे ,रामनाथ घोडके, तुळजीराम शिंदे, सुरेश रोकडे ,सय्यद खालेद, सय्यद जाहेद, विशाल शिंदे यांनी मिळुन नविन सायकल घेऊन दिली. ————————————– वृत्तपत्र वितरण करणा-या मुलाला होणारा त्रास पाहता पत्रकारांनी त्याची वेदना जाणली पोलिसांनाही शोध घेण्यासाठी वेळ दिला आणि दैनिकात मांडण्यापेक्षा एकत्र येत नवीन सायकल घेऊन देत वेदना दुर केली त्याबद्दल मला या पत्रकारांचा सार्थ अभिमान आहे. त्यामध्ये मलाही मदत करण्याची संधी मिळाली . -डॉ. गणेश ढवळे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा