ग्रामीन विद्यालयाची विद्यार्थीनी प्रणिती प्रताप शिंदे चे शिष्यवृत्ती यश !
ग्रामीन विद्यालयाची विद्यार्थीनी प्रणिती प्रताप शिंदे चे शिष्यवृत्ती यश !
नेकनूर -(प्रतिनिधी):-राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत नेकनूर ग्रामीण विद्यालयाची विद्यार्थीनी प्रणिती प्रताप शिंदे हिने घवघवीत यश मिळवले असून ग्रामीण भागातून प्रणिती हिने यश मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाली आहे
 राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परिक्षा २०२१ ची अंतरिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली . ज्यामध्ये प्रणिती प्रताप शिंदे हिने याने ग्रामीन भागातून शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.  इयत्ता चौथीपासून विविध  स्पर्धा परिक्षेत नेत्रदीपक कामगिरी  करणाऱ्या प्रणिती हिने या वर्षी देखील आपल्या यशाची परंपरा अबाधित ठेवत हे यश संपादन केले. या यशाबद्दल कु. प्रनिती प्रताप शिंदे या विद्यार्थीनीचा शिष्यवृत्ती पात्र झाल्या बदद्ल ग्रामीण विद्यालयात सत्काराचे आयोजन करण्यात आले . यावेळी सत्कार करतांना प्राचार्य पैठणे जे.एम. , पालक प्रताप शिंदे व सर्व कर्मचारी वृंद होते .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा