मारहाण करून जखमी केल्याच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता 




मारहाण करून जखमी केल्याच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता

बीड ( प्रतिनिधी ):- बीड येथील मा .३ रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.पी.बी.देशपांडे यांनी आरोपी रेखा आत्माराम घार्गे व ईतर दोघांची निर्दोष मुक्तता केली . घटनेची थोडक्यात हकीकत अशी की , फिर्यादी मनिषा चंद्रकांत घारगे हिने पोलिस स्टेशन बीड ग्रामीण येथे फिर्याद दिली की , ती दिनांक १३-०९ -२०१४ रोजी दुपारी १२.०० वाजता शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाणी शेंदण्याच्या बकेटच्या कारणावरून रेखा घारगे हिने शिवीगाळ केली व सदर घटना रेखा हिने आरोपी संजय यांना सांगितलेवरुन दुपारनंतर २.०० वाजता आरोपी रेखा , संजय व सुनिता हे फिर्यादीकडे गेले तेंव्हा रेखा घार्गे हिचे हातात काठी होती , त्यावेळी आरोपी संजय याने शिवीगाळ केली व धरा असे म्हणाला . तसेच सुनिता हिने सुध्दा शिवीगाळ केली व धरले तसेच रेखा हिने तिच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारले असता डोके फुटुन रक्त निघाले . भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची मुलगी कोमल ही आली असता तिला सुध्दा रेखा घार्गे हिने काठीने डोक्यात मारुन मुक्कामार दिला . त्यावेळी नंदकुमार घाडगे , पांडुरंग आहेर यांनी भांडणाची सोडवा सोडव केली . त्यानंतर फिर्यादी व तिची मुलगी उपचाराकरीता बीड येथे दाखल झाल्या व फिर्यादीचे जवाब घेण्यात आला व त्यावरुन पोलिस स्टेशन बीड ग्रामीणे येथे गुन्हा रजि . नं . १२६/२०१४ कलम ३२४,३२३,५०४,३०६,३४ भा.दं.वि.प्रमाणे नोंदवण्यात आला . सदर गुन्ह्यात तपास करुन दोषारोपपत्र दाखल करणेत आले . मा . प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी , बीड यांचेकडे प्रकरण वर्ग करणेत आले . प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आले . त्यानंतर बचाव पक्षाने घेतलेला बचाव लक्षात घेऊन आरोपी रेखा प्रेताप घार्गे व ईतर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली . प्रस्तुत प्रकरणात आरोपी रेखा प्रताप घार्गे हिच्याकडुन विधीज्ञ अॅड . राधाकृष्ण पंडीत , बीड यांनी काम पाहिले व त्यांना अॅड . कृष्णा विश्वांभर तळेकर यांनी सहकार्य केले .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा