केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते दत्ता देशमुख यांना पुरस्कार प्रदान 
सकाळ’चे दत्ता देशमुख बियाणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 

बीड ।  सकारात्मक लेखन व पत्रकारितेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने ‘सकाळ’चे बीड जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांचा ‘पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी ‘ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन दत्ता देशमुख यांना गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मागच्या वर्षी दर्पण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व मराठवाडा साथीच्या वतीने पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कारांची सुरुवात झाली. राज्यस्तरीय व विभागीय पुरस्कारांसाठी सकारात्मक बातम्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले. यात राज्यस्तरावरील पुरस्कारांत ‘सकाळ’चे बीड येथील जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांना पुरस्कार झाला. मागच्या वर्षीचे व यंदाच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी चांदूलाल बियाणी, जगदीश बियाणी, प्रभू गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वीही दत्ता देशमुख यांना ‘सकाळ’चे संस्थापक डॉ. ना. भी. परुळेकर, जिल्हा रत्न, मौलाना अबुल कलाम आझाद, जिजाऊ रत्न, कै. असरडोहकर, केज तालुका आदर्श पत्रकार समितीचा आदर्श पत्रकार अशा विभागीय व राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा