जिजाऊ जयंती व संक्रांतीनिमित्त स्व. तात्याराम वीर सामाजिक प्रतिष्ठाणचा स्तुत्य उपक्रम




सफाई कामगार महिलांना साडी-चोळीचे वाण व फराळाचे वाटप

जिजाऊ जयंती व संक्रांतीनिमित्त स्व. तात्याराम वीर सामाजिक प्रतिष्ठाणचा स्तुत्य उपक्रम
बीड : जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या स्व. तात्याराम वीर सामाजिक प्रतिष्ठाणने जिजाऊ जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून अनोखा उपक्रम राबवला. साई इलेक्ट्रिकल्स व हल्दीराम स्वीट्सच्या सहकार्याने शहरात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांना प्रतिष्ठाणच्या वतीने जिजाऊ जयंती व मकर संक्रातींच्या निमित्ताने साडी चोळीचे वाण व त्यासोबतच फराळाचे वाटप करण्यात आले. याअनपेक्षीत भेटीने स्वच्छता कामगार महिला भारावून गेल्या होत्या तर प्रतिष्ठाणच्या या उपक्रमाचे सध्या सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या भावनेतून बीड शहरातील विठ्ठल वीर व त्यांचा परिवार सातत्याने सामाजिक काम करत असतात. स्व. तात्याराम वीर सामाजिक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून त्यांनी आजवर राबवलेले सामाजिक उपक्रम जिल्ह्यात चर्चेत राहिलेले आहेत. सामान्यांच्या कामी येतील अशी आरोग्य तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, जि.प.शाळांना आवश्‍यक ती मदत, बीड शहरातील निराधारांना सातत्याने उबदार कपड्यांचे वाटप असो की, दिवाळीच्या काळात गरजू व निराधारांसह अनाथ आश्रमांमध्ये फराळाचे वाटप असो अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते सामाजिक बांधिलकी जपत असतात. यावर्षीही साई इलेक्ट्रिकल्स व हल्दिराम स्विटसच्या सहकार्याने स्व. तात्याराम वीर सामाजिक प्रतिष्ठाणने जिजाऊ जयंती व मकर संक्रांतीच्या निमित्ताने बीड शहातील स्वच्छता करणाऱ्या महिलांना साडी चोळीचे वाण व फराळाचे वाटप केले आहे. बीड शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते या महिलांना या साडी-चोळी व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचारी श्री. चव्हाण व त्यांचे सहकारी व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष वीठ्ठल वीर, कैलास वीर, सुप्रिया विठ्ठल वीर, वर्षा कैलास वीर आदींची उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा