रक्षकांचे वास्तव्य धोक्याच्या इमारतीत. पोलीस आधिकाऱ्याना घ्यावा लागतोय भाड्याच्या खोल्याचा आधार




रक्षकांचे वास्तव्य धोक्याच्या इमारतीत.

पोलीस आधिकाऱ्याना घ्यावा लागतोय भाड्याच्या खोल्याचा आधार.

नेकनूर – दि 19 रामनाथ घोडके । बीड तालुक्यातील नेकनूर येथील निजामकालीन पोलीस ठाणे आहे. येथील अधिकारी, कर्मचार्‍यांची निवासस्थाने सुमारे दहा पंधरा वर्षांपूर्वीच मुदतबाह्य झाली असल्याने पोलीस कर्मचारी यांच्या सह आधिकाऱ्यानाही भाड्याच्या खोल्याचा आधार घ्यावा लागत आसुन काही पोलिसांना मात्र अद्यापही त्याच खोलीत जीव मुठीत धरूनच जनतेचे संरक्षण करावे लागत आहे. सदरील इमारती अत्यंत जुन्या असल्याने दहा पंधरा वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या वापरण्यायोग्य नाहीत असा अहवाल दिला होता. त्या नंतर मात्र नवीन बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते पण प्रत्यक्षात मात्र नवीन बांधकाम लालफितीत अडकल्याने परिस्थिती जैसे थे आहे.

पावसाळ्यात ठाण्याला गळती लागते. त्यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज ठेवायचे कोठे ? असा प्रश्न पडतो. शिवाय साप, विंचू यांचे वास्तव्य नेहमीचेच आहे. संरक्षक भिंत म्हणजे शोभेची वास्तू बनली आहे. नेकनूर येथील पोलिसांच्या निवासस्थांनाची पडझड झाली असून संरक्षक भिंत केवळ नावालाच उरली आहे. पोलिसांच्या निवासस्थांनाची दुरवस्था झाल्याने अनेकजण किरायाने राहणे पसंद करतात. जनतेच्या रक्षकांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

■ येथील पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ४१ एवढी आहे. पोलिसांकरिता केवळ २१ निवासस्थाने असून, ती वापरण्यायोग्य नाहीत.

■ एक पण निवासस्था राहण्यायोग्य नाही तरीही निवासस्थानात रहायचे म्हटले तरी २० कर्मचार्‍यांना किरायाच्या घराचा आधार घ्यावा लागतो.

■ कर्मचार्‍यांना घरभाड्यापोटी २००० ते २२०० रूपये मिळतात. मात्र प्रत्यक्षात ५००० ते ७००० रूपयांपर्यंत मोजावे लागत आहेत.

निवासस्थानांच्या झालेल्या दुरवस्था व सद्य परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना पाठण्यात आला होता ,सदरील ठाण्यासाठी निधी प्राप्त झाला असून नवीन बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली आहे.

शेख मुस्तफा
ठाणे प्रमुख नेकनूर

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा