ज्यांना तीस वर्षात जमलं नाही ते आ.संदिप भैय्या क्षीरसागरांनी करून दाखवलं!
 

बीड शहराला जोडणार्‍या अंकुशनगरमधील पुलाचे भूमिपुजन

प्रभाग क्र.22,23,24 मध्येही सात कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

बीड (प्रतिनिधी):- शहरात आणि ग्रामीण भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बीड शहराला जोडणार्‍या पोलीस कॉलनी येथील अंकुशनगरकडे जाणारा पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. थोडाही पाऊस पडला की अंकुशनगरसह ग्रामीण भागातील अनेक गावांना ये-जा करत असतांना अडचण निर्माण व्हायची. त्याच पुलाचा प्रश्न आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मार्गी लावला आहे. ज्यांना 30 ते 35 वर्षात जमलं नाही ते पुलाचं काम आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी करून दाखवलं आहे. या पुलाच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले असून त्याचबरोबर शहरातील प्रभाग क्र.22, 23, 24 मध्ये एकूण 6 कोटी 93 लक्ष रूपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.


गुरूवार दि.20 जानेवारी 2022 रोजी बीड शहरातील प्रभाग क्र.22,23,24 येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांची विशेष उपस्थित होती. गेल्या अनेक वर्षापासून पोलीस कॉलनी येथील पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. थोडाही पाऊस झाला तर अंकुशनगर भागातील व पुढे ग्रामीण भागाकडे जाणार्‍या नागरिकांचा संपर्क तुटायचा. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्राधान्याने सदरचा रस्ता नाबार्ड अंतर्गत प्रस्तावित करून त्यासाठी 3 कोटी रूपयांचा निधी मंजुर करून घेतला. त्याची प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर त्या कामाचे भूमिपुजनही केले आणि आता सदर कामास सुरूवातही झाली आहे. त्यामुळे ज्यांना तीस वर्षात जे जमलं नाही ते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी करून दाखवलं आहे. त्याच बरोबर प्रभाग क्र.22, 23 आणि 24 मधील विविध भागातील रस्ते व नाल्यांच्या विकास कामांचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैजीनाथ नाना तांदळे, महादेव आण्णा धांडे, बबन बापू गवते, झुंजार धांडे, जावेद भाई कुरेशी, महादेव उबाळे, विजय लव्हाळे, पंकज बाहेगव्हाणकर, गोरख गायकवाड, राहुल आघाव, नितीन खोड, अक्षय शिंदे, सचिन पवार, के.के.वडमारे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, अमोल पारवे, जैतुल्ला खान, वल्लभ चिरके, अजिंक्य पांडव, सुशिल जाधव यांच्यासह स्थानिक नागरिकांची व आदी स्थानिक नागरिकांची व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

मुलभूत सुविधा देण्यासाठी सदैव कटीबद्ध -आ.संदिप क्षीरसागर
सध्या शहरवासियांना रस्ते, नाली, वीज, पथदिवे, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सुविधांची गरज आहे. त्या सुविधा प्राधान्याने सोडविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे. येणार्‍या काळात बीड शहराचा कायापालट केल्याचे दिसून येईल. नुसता कामाचा शुभारंभ नाही तर आपणास प्रत्यक्ष काम झाल्याचे पहायला देखिल मिळत आहे अशी प्रतिक्रिया आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा