शेतकरी हा संस्कृतीचा आत्मा – आप्पासाहेब जाधव




शेतकरी हा संस्कृतीचा आत्मा – आप्पासाहेब जाधव
माजलगाव ( प्रतिनिधी ) : हिंदू संस्कृती मध्ये शेती व शेतकरी हा संस्कृतीचा आत्मा समजला जातो, परंतू अलिकडच्या काळात आधुनिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे खच्चीकरण होत,आहे,यामधून उभे रहाण्यासाठी शेतकऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केले ते हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भगव्या सप्ताहाच्या शेतकरी सन्मान कार्यक्रमात बोलत होते.
मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी दि.१९ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या शुभ हस्ते माजलगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तर भगव्या सप्ताहाच्या चौथ्या दिवशी माजलगाव तालुक्यात ऊसतोड मजुरांना ब्लँकेट वाटप करण्यात आले, यावेळी शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, मा. उपनगराध्यक्ष तुकाराम बापु येवले मा. शहर प्रमुख अमोल डाके, उपतालुकाप्रमुख अतुल उगले, लक्ष्मणराव सोळंके, नामदेव सोजे, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी राहुल सुर्वे, युवा सेना शहर प्रमुख विशाल थावरे, कल्याण बल्लाळे, बाळासाहेब मेंडके, प्रभाकर धरपडे, दिंगाबर सोळंके, प्रल्हाद घाटुळ, नारायण तौर, जयराम राऊत,करण थोरात संभाजी पास्टे,राम कुलकर्णी, शिवमुर्ती कुंभार, सुरज एखंडे, सुखदेव धुमाळ,भारत पास्टे, रुपेश घोडके, शेतकरी,शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा