बिंदूसरा नदीवरील निम्न पातळी बंधार्‍याच्या सर्वेक्षणास आज सुरवात
आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचा सातत्याने पाठपुरावा; बंधाराकम पुलामुळे बीडकरांना फायदा
बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील बिंदूसरा नदीवर बंधाराकम पुल करण्यात यावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून अनेक वर्षापासून करण्यात येत होती. आमदार झाल्यानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या प्रश्नी लक्ष घातले. सातत्याने जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील बीडमध्ये आल्यानंतर त्यांनीही या निम्न पातळी बंधार्‍याच्या कामा संदर्भात पाहणी केली. त्यानंतर शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून सदर प्रकल्पास मंजुरी मिळाली. आता प्रत्यक्षात बिंदूसरा नदीवरील निम्न पातळी बंधार्‍याच्या सर्वेक्षणास सुरूवात होत आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सदर काम पुर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
बीड शहरातील बिंदूसरा नदी पात्रात बंधाराकम पुल बांधण्यात यावा ही मागणी घेवून आ.संदिप भैय्या क्षीरसागर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अनेक वेळा भेटले. पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडेंचेही यांच्या माध्यमातूनही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या बिंदूसरा प्रस्तावाबाबत बारीक-सारीक त्रुटींची पुर्तता करत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून विशेेष बाब म्हणून या प्रकल्पास मंजुरी आणली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत शासनास सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावास शासनस्तरावरून शासनपत्र क्र.संकिर्ण 2021/184/21 भाग 1 जसंअ दि.10.11.2021 अन्वये बीड शहरासाठी पाणी पुरवठा करण्याकरिता बिंदूसरा निम्न पातळी बंधार्‍यासाठी 0.35 दलघमी पाणी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुख्य अभियंत, जलसंपदा विभाग औरंगाबाद यांनी पत्र क्र.ताशा बिंदूसरा निम्न पातळी बंधारा 247 अन्वये प्रकल्पाच्या सर्वेक्षण व अनुशेष करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली असून विभागीयस्तरावर सर्वेक्षण व अनुशेषची कामे हाती घेतलेली आहे. या कामाचा शुभारंभ बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते होणार असून यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह आदी नेते मंडळींची व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकार्‍यांची तसेच जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा