यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजनेसाठी बीड जिल्ह्यामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा:-दत्ता वाकसे




 

पालपालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिले निवेदन

चिंचोन ।

महाराष्ट्र सरकार कडून यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजना ही चालू असून या योजनेमध्ये प्रमुख्याने धनगर समाजाला लाभ मिळावा वाड्या-वस्त्या तील दऱ्याखोऱ्यातील समाजाला हक्काचे घरकुल मिळावा घर मिळावं या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना चालू केलेले असून या योजनेला बीड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील व वाड्या-वस्त्यातील समाजाकडून प्रमुख्याने आपल्याला हक्काचे घर मिळावे या उद्देशाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुका स्तरावरुन ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आपले घरकुलाचे प्रस्ताव दाखल केलेल्या आहेत परंतु या ठिकाणी निधी उपलब्ध नसल्यामुळे प्रस्तावांना मंजुरी दिली जात नाही असे निवेदनात म्हटले असुन ते निवेदन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांना धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आपण या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर आपल्या परळी विधानसभा क्षेत्रांमध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असून या समाजाला मात्र आपल्याकडून न्याय मिळत नाही त्यामुळे वाड्या-वस्त्या वरील दऱ्याखोऱ्यातील समाज बांधव हा यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजनेपासून वंचित राहत आहे आपण विशेषता यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजनेला बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला तर सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल व धनगर समाजातील वंचित असलेल्या आणि जे लोक बेघर आहेत त्या बेघर लोकांना घर मिळेल त्याचबरोबर मेंढपाळ असलेल्या व बारा महिने स्वतःचं पाल सोडून दऱ्याखोऱ्या मध्ये मेंढ्या चारण्यासाठी जाणाऱ्या समाज बांधवांना हक्काचे घर मिळेल त्यामुळे आपण या सर्व विषयाचा विचार करून बीड जिल्ह्यामध्ये यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजनेसाठी जास्तीत जास्त प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन सर्वसामान्य कष्टकरी कामगार व वंचित असलेल्या लोकांना न्याय द्यावा अशी मागणी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कडे धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली तात्या गडदे व सलिम भाई सय्यद आदि उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा