गुणवत्ते सोबत कलागुणांची जोपासना करा- थोटे महाराज




गुणवत्ते सोबत कलागुणांची जोपासना करा : थोटे महाराज

पिंपळनेर ।

शालेय जीवनात शिकत असताना मुलांना गुणवत्ते सोबतच कलागुण शिकविण्याचे काम सनराईज स्कुल करीत आहे. हे योग्य असून विद्यार्थ्यांनी गुणवत्ते बरोबर संस्क्रती व कलागुण जोपासण्याचे काम करावे, असे आवाहन ह.भ.प. गोपाल महाराज थोटे यांनी केले.
पिंपळनेर येथील सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित शिवजयंती कार्यक्रमात थोटे महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. गोपाल महाराज थोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, राम जाधव, संजय नरवडे, बंधन बँकेचे मॅनेजर सचिन कुलकर्णी, संजय सर, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माऊली जाधव, पंचायत समिती सदस्य किशोर सुरवसे, उद्योजक योगेश नरवडे, गोरख कांडेकर, उमेश आनेराव, अनिल सिरसट, स्वप्नील सिरसट, गणेश नरवडे, केरबा मातकर सह आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना थोटे महाराज म्हणाले की, बाल वयातच मुलांनी चांगले गुण व कला जोपासली पाहिजे, गुरुचे मार्गदर्शनाने आई वडीलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाच पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. यानंतर इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करत आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमाला योगीराज नरवडे, नवनाथ नरवडे, जगन सव्वाशे, अशोक ढेंगे, अंगद यादव, विलास यादव, अशोक यादव, दशरथ घाडगे, अशोक खांडे सह शिवप्रेमी व पालक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर सातपुते सह चव्हाण, नागरगोजे, सातपूते मॅडम, आनेराव मॅडम, नरवडे मॅडम, मनिषा ताई, दत्ताभाऊ गौंड, हनुमान खांडे, निलेश वंजारे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमान सातपुते व प्राची देवडे, संध्या होळकर यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा