बन्सल कलासेच्या टायलेंट सर्च स्पर्धा परीक्षेसाठी बालक-पालकांचा उदंड प्रतिसाद
बीड शहरातील तब्बल 15000 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
बीड।
       बीडचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ‘डॉ. सारिका क्षीरसागर’ आणि ‘डॉ. योगेश क्षीरसागर’  यांनी बीड शहरात शैक्षणिक क्षेत्रात नामवंत असणाऱ्या बन्सल कलासेसची उभारणी केली. ज्या इन्स्टिटयूटने भारतात पहिल्यांदाच मेडिकल व आय आय टी मध्ये करिअर करू पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचविण्याचे पवित्र कार्य केले आहे. आज जे सम्पूर्ण भारतात मेडिकल किंवा आय आय टी साठी राजस्थान मधील कोटा पॅटर्न सर्वमान्य आहे, तो कोटा पॅटर्न सुरु करणारे बंसल क्लासेस हे आज बीड शहरात दाखल झाले, ही बाब नक्कीच बीड वासि्यांसाठी अभिमानाची आहे. आणि अल्पवधीतच बीड शहरातील बन्सल कलासेसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बन्सल कलासेसच्या वतीने  दि. 19 फेब्रुवारी आणि दि. 20 फेब्रुवारी रोजी इयत्ता 4 ते इयत्ता 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता बीड शहरातील बार्शी रोडवर असणाऱ्या बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स बन्सल कलासेस इथे टाईलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे भव्य दिव्य आयोजन केले होते. या परीक्षेसाठी बालक-पालकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. सलग दोन दिवस दोन सत्रात संपन्न झालेल्या टाइलेट सर्च स्पर्धा परीक्षेसाठी तब्बल 15000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
    या परीक्षे दरम्यान पालकांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लवकरच या टायलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून बीड शहरातील विजेता कोण होणार आणि कोण कोणत्या विद्यार्थ्यांना बन्सल कलासेसच्या वतीने स्कॉलरशिप मिळणार याची उत्सुकता बीड शहरातील बालक-पालकांमध्ये पाहायला मिळते आहे. येत्या 28 फेब्रुवारीपासून बन्सल कलासेसची पुनरावृत्ती (Revision) बॅच सुरू होणार असल्याची माहिती बन्सल कलासेसकडून देण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले इच्छित ध्येय साध्य करावे असे आवाहन डॉ. सारिका क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा