क्षीरसागरांच्या आपसातील वादात बहुजनांचा बळी जाऊ नये- गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी –नवनाथ शिराळे
क्षीरसागरांच्या आपसातील वादात बहुजनांचा बळी जाऊ नये-
गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी –नवनाथ शिराळे
बीड ।
परवा क्षीरसागरांच्या आपसातील वादामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेमुळे सामान्य जनतेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सामान्य जनतेच्या मनात चिंता निर्माण झाली. आत्ताच माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी अजात शत्रू बिरुदावली लाऊन थाटामाटात वाढदिवस साजरा करून लोकप्रीयेतेचा डंका वाजवला. अजात शत्रू असतील तर गोळीबार घडलाच कसा. गोळीबार करण्याची वेळ का यावी. क्षीरसागरांच्या कुटुंबात वाद आहे का नाही हा संशोधाचा विषय ठरत आहे. सामान्य जनतेच्या समोर गोळीबाराच्या घटना करून दहशत पसरवण्याचा उद्योग म्हणायचा का. असे अनेक प्रश्न बीडकरांच्या समोर उभे आहेत. घडलेली घटना गंभीर आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणारी आहे. कलम १४४ चालू असताना राजकीय वरद हस्ताने अधोरेखित व्यक्तीकडून गोळीबार झाला. याप्रकरणात पोलीस यंत्रनेकडून गुन्हा नोंदवण्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही.आरोपी मोकाट फिरत आहेत.क्षीरसागारांचा वाद असो अथवा नसो गोळीबार घटनेने कायद्याची चौकट मोडली आहे. पोलीस यंत्रणेने निपक्ष पणे या घटनेची चौकशी करावी. वादाचे खरे कारण जनतेचे समोर आणावे. आणि तातडीने आरोपीला अटक करून त्यांची शस्त्र जप्त करावी. आगामी काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाऊल उचलावे असे मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तथा मा.न.प.सभापती नवनाथ शिराळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे कि, केवळ सत्ता आणि संपत्तीच्या लालसेपोटी क्षीरसागर कुटुंबातील सदस्य अशा घटना निर्माण करून स्वत:चे वर्चस्व आणि दहशत निर्माण करतात. कालच्या घटनेमध्ये बहुजनांच्या गरीब कुटुंबातील युवकांना बेदम मारहाण करून गंभीर इजा केली गेली. व गोळीबारात जखमी केले. दुर्दैवाने त्याच गोळीने तरुणांच्या जीवाचा वेध घेतला असता तर गरिबांच्या मायबापांना किती महाग पडली असती.याची दखल क्षीरसागर आणि पोलीस यंत्रणेने घ्यावि. कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षकांनी या गुंडागर्दीवर तातडीने अंकुश लावावा.
क्षीरसागरांना मालमत्तेसाठी आपसात भांडण्याचा अधिकार लखलाभ असो. परंतु या वादात कोणत्याही बहुजनाचा बळी जाऊ नये, हि अपेक्षा आता जनतेनेच जपायला हवी..कारण क्षीरसागराचा इतिहास, भूगोल लक्षात घेता आजपर्यंत बहुजनांनाच क्षति पोहोचली आहे.त्यामुळे बहुजन जनतेने वेळीच सावध होऊन क्षीरसागरांच्या कटकारस्थानात आपला बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी.असे आवाहन नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा