शिवजयंती निमित्त आयोजित स्पर्धा परीक्षेत इयत्ता आठवी वर्गातून शेख नजाबत मयुर सर्वप्रथम




शिष्यवृत्ती म्हणून मिळाले वीस हजाराचे बक्षीस !

या यशाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव
वडवणी ।
कोटा राजस्थान येथील प्रसिद्ध असलेल्या बंसल क्लासेस यांनी बीड येथे आपली शाखा सुरु केली असुन सदरील क्लासेसचे बीडचे संचालक म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सौ.सारीका क्षीरसागर हे काम पाहत आहेत.दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येत असते परंतु यंदाची शिवजयंती बीड शहरवासीयांना कायम स्मरणात राहील अशी ऐतिहासिक साजरी करण्यात आली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने कोटा राजस्थान येथील प्रसिद्ध बंसल क्लासेसच्या बीड शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजीत करण्यात आल्या होत्या या परीक्षेचा निकाल रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला असुन इयत्ता आठवीच्या वर्गातून शेख नजाबत मयुर ने प्रथम क्रमांक पटकावून शैक्षणिक शिष्यवृत्तीस पात्र झाला आहे.शेख नजाबत मयुर यास वीस हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे शेख नजाबत हा औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध सि.ए शेख फारुख व डाँ.शेख मुजीब यांचा पुतण्या असुन ऊपळीचे माजी सरपंच तथा ऊपळी हायस्कूलचे कोषाध्यक्ष शेख मयुर यांचा मुलगा आहे.त्याच्या या यशाबद्दल बंसल क्लासेस बीडचे प्रमुख श्री.सचीन चव्हाण व्यवस्थापक श्री.गणेश सर शिक्षण संस्था महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिपक घुमरे द.बा घुमरे स्कुलचे मुख्याध्यापक श्री.शेंडगे सर तसेच ऊपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.भागवत बडे व ईतर शिक्षकांनी तसेच ऊपळी येथील उद्योजक शेख मोहसीन स्वागत करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा